प्रभात समयी ऐकत सुस्वर किलबिल पक्ष्यांची
कुंतल सुरभित तरुचे सुकवी सळसळ वाऱ्याची
माठ विकतसे शांत दुपारी एकट व्यापारी
झुळझुळणारा पदर पिंपळी गानपरी सावरी
पिवळ्या कुसुमांनी नटलेला वृक्ष उभा दारी
फळे खावया उदुंबरावर येतील का खारी
सांजेला झाडांना देई वनमाळी पाणी
देवापुढती दिवा लावुनी गाते मी गाणी
दिवसभराच्या आठवणींची लिहूनिया डायरी
शांतपणे मी झोपी जाते मऊ बिछान्यावरी