परिमल उधळित पुष्प पाकळ्या उमलत जाती
रंग बरसती धुंद होउनी कोमल पाती
कोमल पाती मुग्ध कळ्यांशी माझे नाते
गरगर फिरतो हात आणखी दगडी जाते
जात्यामधुनी पीठ झरझरे ऐकत किलबिल
वाऱ्यासंगे गात येतसे झुळझुळ परिमल
परिमल उधळित पुष्प पाकळ्या उमलत जाती
रंग बरसती धुंद होउनी कोमल पाती
कोमल पाती मुग्ध कळ्यांशी माझे नाते
गरगर फिरतो हात आणखी दगडी जाते
जात्यामधुनी पीठ झरझरे ऐकत किलबिल
वाऱ्यासंगे गात येतसे झुळझुळ परिमल