तम म्हणजे पुदगल द्रव्याचा सप्तम पर्याय
तम म्हणजे काळा काळा अंधकार घन होय
अष्टम पर्यायी छाया ती दो प्रकाराची
तदवर्णपरिणत अन प्रतिबिंब उपप्रकाराची
दिसे रंग रुप जसे तसे ते तदवर्णपरिणत
केवळ छाया उन्हात पडते ते म्हण प्रतिबिंब
पुदगल द्रव्याचा आतप हा नववा पर्याय
सूर्य प्रकाशालाही म्हणती आतप वा ऊन
चंद्राचा जो प्रकाश शीतल उद्योत आहे
जो शीतल प्रकाश तो पर्यायी दशम आहे
२७ मात्रा