पळस …
जरी पुजसी जगव अंगणी तुळस माणसा
सम्यकदर्शन-ज्ञान-शीलयुत पळस माणसा
ओक मनातिल किळस साठली स्वतःसमोरी
चढव स्वतः तू आत्ममंदिरी कळस माणसा
…….
कुंतल बट
कळी मुग्ध अन अर्धस्फुट ही
हळद केशरी कुंकुम घट ही
उमल उमल तू कलिके म्हणते
भाळावरची कुंतल बट ही
…….