पाऊले वाळवंटी चालती ही पाऊले
सामान अपुले वाहती ही पाऊले
हे निळे आभाळ वरती दाटुनी यावे कधी
भिजविण्या रेती तळीची गावे कधी
…..
नित्य लिहावे काहीतरी मी मला जिंकण्यासाठी
मला जिंकुनी मीच लिहावे मला हरवण्यासाठी
शब्दांमधुनी मोद उधळते भूवर साऱ्या
वरती जाते कधी कधी मी गगन चुंबण्यासाठी