कधी लिहावे एकच गाणे
कधि पाडावा पाऊस त्यांचा
धारांतिल वेचुनिया गारा
उतरवुया हातांचा पारा
चेहऱ्यावर तळव्यांना फ़िरवुन
गुलकंदी गालांना खुलवुन
झरता अश्रू झरझर गाली
शाल पांघरुन पाठीवरती
फूलपाखरी पाखर घालू
कधी लिहावे एकच गाणे
कधि पाडावा पाऊस त्यांचा
धारांतिल वेचुनिया गारा
उतरवुया हातांचा पारा
चेहऱ्यावर तळव्यांना फ़िरवुन
गुलकंदी गालांना खुलवुन
झरता अश्रू झरझर गाली
शाल पांघरुन पाठीवरती
फूलपाखरी पाखर घालू