प्याल्यामध्ये पेय भरावे – PYAALYAA MADHYE PEY BHARAVE


प्याल्यामध्ये पेय भरावे भरून गाण्या
हात पाय अन ध्येय असावे तरून जाण्या
जाण्यासाठी दूरदूरवर पैल तटावर
भटकत असतो गात गुराखी ताल सुरांवर
बासरीतुनी गीत उतरते डोळ्यांमध्ये
थेंबे थेंबे प्रेम बरसते प्याल्यामध्ये


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.