कऱ्हा असूदे अथवा नीरा नीर तिच्यातील स्वच्छ वाहूदे
प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे
काठावरती मळे फुलावे
हिरवे हिरवे ऋतू सजावे
कणसामध्ये भरोत दाणे झुळूक गात वाहूदे
प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे
नद्यान करिती पर्वा याची
कोण पिकविते काय जलातून
देत राहती विनाअपेक्षा काही कुणी म्हणूदे
प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे
अंतर अपुले नितळ रहावे
डोकावून मग त्यात पहावे
अनेक धारा जरी अंतरी जलात सुंदर बिंब दिसूदे
प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे