पुदगल द्रव्याच्या पर्यायी असती एकुण दहा
त्यातिल दुसऱ्या पर्यायीला म्हणती बंध पहा
स्वाभाविक प्रायोगिक हे बंधाचे दो विभाग
वैस्रसिक हे स्वाभाविकचे आहे दुसरे नाव
वीज ढग नि इंद्रधनु वैस्रसिक बंधात येतात
पुरुष प्रयत्नाविनाच घडे हा स्वाभाविक बंध
प्रायोगिक जो पुरुष प्रयत्ने त्याचे दो प्रकार
एक अजीवाचा बंध दुजा जीव-अजीव बंध
लाकूड लाखेचा बंध हा अजीवाचा बंध
जीव-अजीवाचा मग आत्म-कर्म-नोकर्म बंध
२६ मात्रा