स्वभाव जुळता दोन जीवांचे जुळे कुंडली आपसूक
विचार जुळता दोन घरांचे जुळे कुंडली आपसूक
मानपान अन देणेघेणे देऊ फाटा साऱ्यांना
देवापुढती झुकवुन माथा अर्थ देउया नात्यांना
बाह्यरूप अन पैशाहुनही महत्त्व आहे प्रेमाला
दोघांमध्ये लुडबुड करण्या नकोच संधी पाप्यांना
प्रामाणिक राहूनच टिकवा नात्यांमधला नवेपणा
स्वाभीमानी जीवन जगण्या ताठ राहुद्या नित्य कणा
अंतर मिटवा अंतरातले जपा अंतरी प्रीतीला
कलह टाळण्या जीवांमधला जपा न्याय अन नीतीला
सकार-आत्मक आत्मे असता छत्तिस गुण जुळतात खरे
त्या आत्म्याच्या कुटुंबियांना मित्र सई मिळतात खरे
पक्षपात जर दूत मृत्युचे करतिल आता धरेवरी
धाडिन त्यांना यमसदनाला करे ‘सुनेत्रा’ बात खरी