सांज समय बेला सुंदर
उजळ आत्मियाचे मंदिर
निरांजनी तूप स्नेह
पूर्ण त्यात भिजव वात
पेटवून शुभ्र ज्योत
णमोकार मंत्र म्हणत
भजन म्हणू खास खास
विरण्यास भ्रम भास
चित्त ठेव चैतन्यात
कैवल्याच्या चांदण्यात
डुंब ज्ञानसागरात
रमव मन दर्शनात
सांज समय बेला सुंदर
रम्य आत्मियाचे मंदिर