भांडीभांडी अन भांडीकुंडी
चल भर प्यान पॉट कळसा गिंडी
गंजात पाणी भरून ठेव गो
प्यायाला येइ साजुक देव घो
कामं किती वरी करून राह्यले
तरी तुझे ना तेरा गं वाजले
गाडग्यात आंबिल रटरट शिजतंय
दुधाचं लोटकं भरभरुन सांडतंय
संगती घेऊन सुंदर कोष्टी
ये ग ये सई सांगाया गोष्टी
छप्पापाणी नी सागरगोटे
खेळू बिगी बिगी होऊ छोटे
भातूकलीचा खेळ मांडूया
दाटूमुटीचे बळे भांडूया
मात्रावृत्त – १८ मात्रा