कंकण बिलवर करी धरेच्या सुवर्णगर्भी हिरवे सुंदर
सतेज भालावरती कुंकुम आभाळीचा सूर्य शुभंकर
हृदय धरेचे भारत भूमी शुद्ध जलाने तुडुंब भरले
पर्वत रांगा पाय पाऊले तयाभोवती तळ्यात कमळे
कडेकपारी पंचेंद्रिये हात जणू या घन वनराई
हास्य तिचे जणू पुनव चांदणे शुभ्र फुलांसम ठाई ठाई
धबधबणारे प्रपात म्हणजे वस्त्र तिचे मोत्यांसम धवला
शुभ्र हिमालय मुकुट मस्तकी स्वर्ग चुंबितो गगनामधला
चंद्र तारका नक्षत्रांचे अलंकार तिज शोभुन दिसती
सृष्टी देवी ब्रम्हांडाची अमुची पृथ्वी प्रिय अम्हा किती