पर्यायांनी दहा युक्त हे, पुदगल द्रव्य प्रकार
पर्याय सहाव्या भेदाचे, असती सहा प्रकार
करवत करकर लाकुड कापे, उत्कर साठत जाय
भुसा म्हणतसे त्याला कोणी, हे पण त्याचे नाव
धान्य दळाया जाते फिरते घरघरते अलवार
भरभर सांडे पीठ भोवती, चूर्ण तया म्हणतात
मडके फुटता खंड विखुरती, जमिनीवरती फार
त्या खंडांना खापर म्हणती, बोलीचा व्यवहार
कडधान्याला भरडुन हलके, पाखडता हळुवार
उडे चूर्णिका वाऱ्यावरती, त्याला म्हणती साल
मेघांची जी पटले त्यांना, प्रतर असे म्हणतात
आपण म्हणतो पटल तयांना, हेही खरेच नाम
गरम करुनी लोखंडाला, देता त्याला ठोक
लखलख उडणाऱ्या ठिणग्यांना,अणुचटन च म्हणतात
मात्रावृत्त – १६+११=२७ मात्रा