मनी माऊ सांगा कुठे चालली हाय?
मळ्यातल्या आडावर चालली हाय।
का बरे आडावर चालली हाय?
शेंदाया पाणी चालली हाय।
बादली नि घागर कुठं हाय ?
पाठीवर पखाल बांधली हाय।
कुणाची वाट बघतेय माऊ?
चिऊची वाट बघतेय माऊ।
चिऊला उशीर का झाला?
चिऊच्या बाळाला ताप आला।
माऊला मेसेज केलाय काय?
चिऊचं वॉटसाप बंद हाय।
माऊला आडावर दिसलं कोण?
चिऊ दिसली बांधून शेंड्या दोन।
चिऊने बाळाला कुठं सोडलंय ?
चिऊने बाळाला घरी ठेवलंय।
बाळाची सोबत करतंय कोण?
बाळाचे आजोबा आलेत दोन।
बाळाला औषध देणार कोण?
बाळाचे आजोबा डॉक्टर पोन।
आडावरचा पोहरा कुठेकुठे हाय?
मैनेने पाण्यात फेकला हाय।
पाण्यात उडी कोण मारणार?
पाण्यात उडी चिऊ मारणार।
चिऊला पोहायला येतंय काय?
चिऊला पोहायला येतंच न्हाय।
चिऊने पाठीला बांधलंय काय?
पाठीला फ्लोट बांधला हाय हाय।
चिऊने उडी मारली काय?
चिऊने उडी मारली बाय।
चिऊने पोहरा काढला काय?
चिऊने पोहरा काढला हाय।
आडाचं पाणी आता शेंदणार कोण?
चिऊ आणि माऊ मैत्रिणी दोन।
पखालीत पाणी मग कोण भरणार?
पखालीत पाणी मग मैनू भरणार…