मस्त मस्त पावसात
सख्या फिरू वारियात
पांघराया शाल हवी
तनू म्हणे गारव्यात
नाचू पाय आपटीत
वाळूवरी अंगणात
रेतीमध्ये तळपाय
बुडवूया खोल आत
चिमणीचा खोपा बांधू
झाड लावू परसात
नांद्रूकीच्या फांदीवरी
झोके घेऊ झुलूयात
बाजगरी ऐसपैस
चल गप्पा मारुयात
भिजलेल्या वाटांवरी
रवापाणी खेळूयात
दिसता तो फरूड गे
वाघ त्याला म्हणूयात
चंदनाच्या पाटावर
काचापाणी खेळूयात
सये चल गात गात
वारुळाला जाऊयात