माप उलट – MAAP ULAT


माप उलट माप उलट
झरा झरझरुदे उलट सुलट
झरझर धान्य सांडू दे घरात
बाहेर पडून आता उंबऱ्यात
माड! ताड! झालेत ताडमाड!
पक्ष्यांना आता
गाण्यासाठी धाड…
पक्षी गातोय पहाटगाणे
ट्विट ट्विट कुहू कुहू !
झणी म्हणू की तुला वणी
कर लवकर वेणीफणी
खाउयात सुतरफेणी
वनी वणी नीव णीव
नीव म्हणजे काय बाय
कळतंय पण आठवत नाय
नीव म्हणजे निवत जा
नीव म्हणजे पाया पाय
नीव म्हणजे “तुम्ही” पण
ती पण भाषा आपलीच म्हण
गोल गोळ चित्रलिपी
दिसते छान साजरी
तशीच देवनागरी
असं सगळं कायबाय
टिटवीचं टील गातंय माय
ट्विटर टील च्रीपर चील
तेली बसला तेल गाळायला
जाऊन ये रे टिटवाळ्याला
इथेच आहे टिटवाळा
घाल बाळाच्या पायात वाळा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.