निर्मलतेचे शिल्प गोजिरे मुनी दिगंबर जैनी
कमंडलू अन पिंछी त्यांची पूजनीय मन्मनी
वीतराग विज्ञान जाणुनी जैन धर्म जाणा
आत्म्याचे हित करता करता साधा परमार्था
खऱ्या दिगंबर साधू पुढती लोटांगण घाला
अंधश्रद्धा पूर्ण उखडुनी हृदयी जागवा श्रध्दा
निंदा करण्याआधी त्यांची आत्मपरीक्षण करा
पूजा करुनी आत्मगुणांची दशधर्मांना वरा
वेगामध्ये वाहनावरी रस्त्याने पळता
तुम्हीच अपघाताला तुमच्या आमंत्रण देता
संयम पाळा धर्मामध्ये मिळेल तुम्हा मुक्ती
मुला फुलांतच भरली आहे अमुची भविष्य शक्ती