मैलाचा दगड (MILE STONE )


मैलाचा दगड (MILE STONE )
आपल्या आयुष्यात स्वतःसाठी,कुटुंबासाठी, समाजासाठी, संस्कृती संवर्धनासाठी, निसर्ग प्रकृती जपण्यासाठी आपण जे कार्य करत असतो, ते कधी कधी आपल्यासाठी मैलाचा दगड पण ठरत असते. त्याच्याकडे पाहताना आपणास कधी आपण स्वतःवर स्वतःच घालून घेतलेल्या मर्यादा जाणवतात तर कधी आपल्या अंतरात्म्याची अमर्याद असीम शक्ती पण जाणवायला लागते. पुन्हा एकदा आपण नव्याने झळाळून उठतो. आयुष्याच्या वाटेवर हिम्मतीने चालण्याचे बळ हे मैलाचे दगड देतात. कधी कोणाचा आधार व्हायला तरी कधी कोणाचा आधार घ्यायला आपण पुढे पुढे जात राहतो. आपला समाज,आपले गाव,देश,प्रांत यांच्या सीमा ओलांडून अखिल विश्वातील निसर्ग नियमन संस्था, खळाळणारे निर्झर, नद्या समुद्र, धबाबणारे प्रपात उंच पर्वत डोंगर दऱ्या, वनराई, झाडेझुडुपे कातळ … त्यावर जिजीविषेने उगवणारे तरु ..त्यावरची फुले, कणसे पाने फांद्या आपल्याला आगे बढो! हाच संदेश देत असतात. चला तर मग! उठा ! सज्ज व्हा! रानवाऱ्यासोबत, सुगंधी रंगीबेरंगी आणि शुभ्र फुलांसोबत आपणही रंगूया ..सुगंध प्राशन करूया.. मुलाबाळांना प्रेम देऊया.. कमवूया प्रेम नाती मैत्री समृद्धी संपदा विश्वास आणि उदंड पैसा !! चला तर मग, कार्य करूया .. सळसळणाऱ्या हवेप्रमाणे उत्साहाने भरून वाहूया …


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.