गुलबक्षीचा, रंग ल्यायल्या, गालांवरती, मीनाकृतिसम, नयनांमधले, अश्रू भरले, टपोर मोती, उधळुन देऊ, मुक्त मनाने!
नेणीवेतिल, विस्मरणातिल, वा स्मरणातिल, कर्मफळांतिल, कठिण कवचयुत, कटू बियांची, भरून पोती, उधळुन देऊ, मुक्त मनाने!
हिरे माणके, पुष्कराज अन, मौक्तिक पाचू, याहुन तेजोमय रत्नत्रय, अंतर्यामी, ज्या रत्नांच्या, त्या रत्नांच्या, वेलीवरची;
दवबिंदूसम, निर्मळ दुर्मिळ, खुडून पुष्पे, पानापानावर हृदयाच्या, काव्यामधुनी, जपली होती, उधळुन देऊ, मुक्त मनाने!
मात्रावृत्त( २४+२४+२४=७२ मात्रा )