लावला सापळा आज जो तो खरा
घातला मी तुला साज जो तो खरा
पांढरी कार अन लाल बत्ती वरी
खास माझा असा बाज जो तो खरा
पकडले कैक मी फोडुनी बांगड्या
ओळखे फक्त आवाज जो तो खरा
काय सांगू कुणाला करांच्या कळा
वाजवी मस्त पखवाज जो तो खरा
भंगलेले जरी शिल्प जुळते पुन्हा
जाणतो यातले राज जो तो खरा
बांधली तू हवेली विटांची जरी
शिंपल्यांचा तुझा ताज जो तो खरा
पुण्य माझे अता ये फळाला पुन्हा
दाखवे पाजळे माज जो तो खरा
लगावलीः गालगा गालगा गालगा गालगा
मात्राः २१२ २१२ २१२ २१२ = २०