तूच बनविले तिजला वेश्या
तिच्याभोवती रेखुन लेश्या
अपंग असुनी तिला भोगले
वर म्हणशी की लाड पुरविले
कुण्या जन्मीचा असशिल वैरी
राब राबवुन दिलीस कैरी
तुझी लक्तरे वेशिस टांगुन
दमली तीही नाचुन नाचुन
पुरे नाच हा आता नंगा
कितीजणांना खाशिल आता
तुझी कुरुपता तिला न डसली
ती तर सौंदर्याची पुतळी
नियत स्वतःची रोज लिहावी
पापेसुद्धा रोज धुवावी
उंदिरसुद्धा सुंदर तुजहुन
प्रामाणिक रे घुंगूर तुजहुन
माणूस असुनी धोंडा बनशी
ओत स्वतःवर भरली कळशी
करेल यांना शासन धरणी
म्हणे ‘सुनेत्रा’ शूर मर्दिनी