वरण भात जरि त्यास आवडे ताक कण्या तिज आवडती
जात्यावर ती ज्वारी भरडे ताक कण्या तिज आवडती
तोलुन मापुन तो खातो पण हवे तेवढे खाते ती
बाथ घेतसे टबामधे तो शुभ्र प्रपाती न्हाते ती
भाताने बघ वजन वाढते नकोच खाऊ म्हणते ती
जिमला जावे तो म्हणतो तर फिरण्या जाऊ म्हणते ती
तो म्हणतो तिज प्रीत करूया ती म्हणते पण कर मैत्री
प्रीत नको रे गर्दीमध्ये प्रीतीचे रे घर मैत्री
तिचिया कवितेमध्ये मतले गझलेखातर उधळे ती
त्याच्यासाठी पणास लावे जे जे जवळी सगळे ती