बघ वाजले बारा अता
वाजवु तिन तेरा अता
धादांत खोटे बोलणारे
मौन का झालेत सारे
काटा पुढे सरके पळे
अज्ञानही सरुनी गळे
आता तरी बोला खरे
जपण्यास अपुली पाखरे
ही पाखरे फुलपाखरे
अपुलीच जणु ही लेकरे
भय सोडुनी मत नोंदवा
अधिकार आहे गाजवा
या तोडुया कारा अता
प्या मुक्त हा वारा अता