अंगणात आल्या सरी
आषाढाच्या वांड पोरी
गळा मौक्तिकांच्या माळा
पायी घुंगराचा वाळा
पाखरांचे थवे गाती
ढगांमध्ये उंच जाती
जाई जुई चाफा कुंद
सुगंधाने मन धुंद
हवा जरी गार गार
आजाराचा गेला भार
फुलापरी मन ताजे
गीत प्रीतीचेरे गाजे
अता नाही घातपात
जगू सारे मस्त शांत
मधुमिलनाची घडी
उमलली गुलछडी
नाही अंगी कसकस
जीवनात नऊ रस
जगू आणि जगवूया
वृक्षवल्ली वाढवूया