शीर्षक दहा – SHEERSHAK DAHAA


कवितेचं शीर्षक पहा शीर्षक दहा !
कविता लिहिते पानावर, क्रमांक त्याचा दहा !
पाच अधिक पाच केल्यास मिळतात हो दहा !
दोन गुणिले पाच करा मिळतीलच दहा !
वीसातून उणे करून बघा दहा ! मिळवायला दहा !!
वीसाला भागा दोनने भागाकार दहा !
शंभराला दहाने भागा उत्तर मिळेल दहा !
शंभराचे काढा वर्गमूळ भेटतील दहा !
बास झाल्याका इतक्या क्रिया मिळवायला दहा !
आणखी हव्याच क्रिया तर;
एकात मिळवा नऊ !
दोनात मिळवा आठ !
किंवा एक अधिक दोन मध्ये मिळवा सात !
उणे करा नव्वदातून ऐंशी !
किंवा अकरातून एक !
दहा दहा दहा ! दहा फक्त दहाच !
अंकांच्या अनंत क्रिया करून तुम्ही पहाच !
अंकही अनंत आणि क्रिया मजेदार !
सकारात्मक विचार करा उघडा भावनांचे द्वार !


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.