सा रे ग म प ध नी सा
सा नी ध प म ग रे सा
म्हणता म्हणता शिकलो आपण
गाणे सुंदर जगण्याचे
सूरपेटीवर फिरवित बोटे
शिकलो संगीत फुलण्याचे
हुरहुर थोडी…
थोडी थोडी अगदी थोडी
वाढविते प्रेमातिल गोडी
तबल्यावरती ताल धराया
त्या तालाचे गणित कळाया
धर आधी पायांनी ठेका
ऐक कधी मोराच्या केका
सोड तुझा नन्नाचा हेका
धुंद होऊनी नाच नाच तू
म्हण म्हण काही शब्द आज तू
ता थै तै या तैया ता थै
असतो पैलतीराचा पै पै
पै पै जोडुन पुण्याचीरे
कळेल खोली शुन्याचीरे
रे रे सा रे सा रे ग म सा रे
गात वाहते आता वारे
सा नी ध प सा सा सारे सारे …