घडवा सर्व सुंदर सुंदर
क्षितीज आणिक धरणी अंबर
बांधतील वृक्षांना झुंबर
पैंजणात वेलींचे घुंगर
गातिल गाणे सुंदर सुंदर
मिटेल जीवांमधला संगर
अधर घालता ठिणगीवर फुंकर
तयात फुलती तेजस अंकुर
मंत्र अहिंसा म्हणतिल कंकर
थांब जहाजा आले बंदर
वेड्या पाड्या हंबर हंबर
उधळत गा तू सुंदर सुंदर