This poem describes the costume of newborn poem. Here costume is sadee and cholee.
नव्या कोऱ्या कवितेला नवी कोरी साडी चोळी
नवा कोरा गंध तिचा लुटावया आली टोळी
चोळी लाल कुंकू रंगी साडी पिवळी हळदी
जांभुळल्या काठावर फुलपाखरांची गर्दी
मोरपिशी पदरावर पोपटांची वेलबुट्टी
वेणीतला मोती गोंडा करे त्यांच्याशी ग गट्टी
पुरे आता लाडीगोडी म्हणे काव्य बाळी भोळी
करा बारसे थाटात झाडा बांधुनिया झोळी
झोका जाता उंच उंच झोळी टेकते आभाळी
होते ढगात पसार पंखी-लुटारूंची टोळी