सायंकाळी निळ्या नभात पाखरे जेव्हा उडत जातात
अनिलांच्या दशपदीतले कानेमात्रे जिवंत होतात….
परसदारी जास्वंदीवर लाल फूल डोलू लागतं
हृदयतळातून वर येऊन प्रेम तुझं डोलू लागतं….
प्रेम तुझं खरंच होतं पण तुला बोलवत नव्हतं
पण मला आता वाटतं मौन तुला आवडत होतं ….
मी तू . . तू मी… करत कधीच बसले नाही
म्हणून धूळ केर-कचरा मनात माझ्या साठत नाही….
गझल असूदे अथवा सुनीत काय फरक पडतो रे
सुका असुदे अथवा ओला कचरा कचरा असतो रे