In the temples of goddess Ambabai, Tulajabhavani, Renukadevi, Yallammadevi the devotees play with roundshaped pots of metals. In Marathi this play is known as ‘GHAGARI GHUMAVINE’. This is one of the happiest moments in the devotees life.
रंग कणिका अंबरातल्या उधळिल्या सागरी
सुंदर घुमविती घागरी
घागरी घुमविती घागरी
यज्ञ पेटला संधीकाली
लोभ-मत्सरा जाळे होळी
बालके वाजविती भेरी
सुंदरा….
ठिणग्या बरसत वीज नाचते
धरणीवरती अंबर झुकते
लालस पिवळी हिरवी निळसर
भक्तिची वस्त्रे जरतारी
सुंदरा …..
पाहून उत्सव नभ हे हसले
गर्जत गर्जत मेघ वर्षले
मृदगंधाने झेले भरले
बाग उमलली धरेवरी गं धरेवरी