आधी सुधारा स्वतःला
त्यानंतर जगाला !
स्वतःपासून कराल जर सुरुवात
तर मग पेटेल मस्त ज्योत !
ज्याच्या वाती सात सात !!
देहाचे निरांजन प्रकाश देईल
परिसर सारा उजळून जाईल !
दिव्यात ओता तेल प्रेमाचे
वहन असावे प्राणवायूचे !
सम्यकदर्शनाची ओढता काडी !
पकडा सहज ज्ञानाची नाडी !!
चालेल सुंदर चारित्र्याची गाडी 1!!
नियोजनाने वसवा नगरे वस्ती वाडी !
मुलांसाठी आणा खेळणी रंगीत बाहुला बाहुली
लाकडी घोडागाडी किंवा फूल गुलबकावली !
संसार करावा सुखाचा!
हित जपावा कुटुंबाचा !!
त्यातच भला देशाचा !!!