सूक्ष्मपणा पर्याय तिसरा पुदगल द्रव्याचा
सूक्ष्मपणाचे प्रकार दोन समजुन घे त्यांना
सर्वात सूक्ष्म बघ परमाणू उदाहरण हेच
प्रकार पहिला हाच असे ना कसलाही पेच
दुजा असे आपेक्षिक सूक्ष्म अपेक्षेने जाण
अपेक्षेस तू नच म्हण तुलना हा तर स्याद्वाद
पेरूहुनही सूक्ष्म चेरी चेरीहुन ओवा
ओव्याहुनही सूक्ष्म त्याला जलद जलद शोधा
पुदगल द्रव्याच्या तिसऱ्या पर्यायाला जाण
पुदगल द्रव्यामध्ये आहे अनेक गुण खाण
मात्रा २५