Years pass away. New year comes regularly at the same time. But, not only every year but also every day, every moment gives knowledge to us only if, we think positively. This message is given in this poem.
दिवसामागुन दिवस उलटले महिने वर्षे किती
नेमे येते नवे वर्ष हे कौतुक त्याचे किती
क्याटरिना अन रिटा सुनामी गर्जत हे आले
बेचिराख जरी जीवन झाले राखेतुन फुलले
शिशिरामध्ये झडती पाने वसंत देतो फुले
जुन्या क्षणांच्या हिंदोळ्यावर पुन्हा नव्याने झुले
तोच सूर्य अन तोच चंद्रमा रोजच भासे नवा
चैतन्याची खूण ओळखा हृदयामधला दिवा
मातीमधुनी पुन्हा थरथरे वीणेचा झंकार
मृदुल पोपटी पानांमधुनी सृजनाचा हुंकार
स्नेहाने प्रेमांकुर फुलवा तम मत्सर पळवा
तोरण बांधुन मनास हिरवे नववर्षा जोजवा