स्थूलपणा पुदगल द्रव्याचा चौथा पर्याय
सूक्ष्मपणासम ढोबळ त्यातिल प्रकार दो जाण
सर्वांमध्ये अधिक स्थूल जो समस्त जगतात
जगास व्यापे पूर्ण असा जो तोच महास्कंध
आंब्याहुनही स्थूल खरबूज त्याहुन टरबूज
टरबूजाहुन स्थूल शोधण्या आपेक्षिक स्थूल
महास्कंध अन आपेक्षिक हे विभाग दो जाण
स्थूलपणाला जाणायाला उपयोगी फार
२५ मात्रा