In this poem the poetess urges women to fight for their freedom. She asks them to spread the fragrance of the heart. She appeals to women to discover the happiness that lies within by breaking the shackles of injustice and oppression. In the end, the poetess asks women to take that first step to live like a human.
स्वानंदाचे फूल उमलता
मनात तुझिया सखे
भीती शंका अन प्रश्नांचे
विरून गेले धुके
प्राजक्तासम दरवळुदे गं
आत्मगंध तव सई
पिऊन वारे स्वातंत्र्याचे
उमल जशी तू जुई
नकोस मांडू प्रदर्शनी तू
देह जरी साजरा
मृदुल आतल्या आवाजाची
घे ना दखल जरा
तुझ्याच हाती घे तूआता
धनुष्य पेलावया
बाण सोडुनी पेटव ठिणगी
स्फुलींग उजळाया
देवत्वाच्या अन दास्याच्या
तोड अता शृंखला
मानव म्हणुनी जगण्यासाठी
उचल तुझ्या पावला