आत्म्याचे हित कशात रे
आत्म्याचे हित सुखात रे
सुख आकुळता रहितच रे
सुखात व्याकुळता नच रे
आकुळ व्याकुळ स्थिती करी
तगमग तगमग जीवाची
तगमग संपे जीवाची
कास धरुन अध्यात्माची
अंतर्दृष्टी ज्यांना रे
सम्यगदर्शन त्यांना रे
अंतर्दृष्टी उघडाया
खऱ्या गुरूला जाणूया
दर्शन शास्त्रे खरी खरी
खऱ्या गुरूची वाच तरी
मात्रावृत्त – १४ मात्रा