जसे वाटते तसे लिहावे
त्या त्या समयी अर्थ कळावे
नंतर काथ्याकूट करोनी
जे जे हितकर तेच जपावे
अनेक जीवांसाठी सुद्धा
उपयोगी ते नित्य पडावे
लिहिणाऱ्याला महत्व द्यावे
ज्याचे त्याला श्रेय मिळावे
फुकट कुणी ना ते लाटावे
इतिहासाला जतन करावे
भूगोल सुंदर घडवित जावे
व्यायामाने तन घडवावे
अभ्यासाने मन फुलवावे
कलागुणांनी बहरुन यावे
व्यवहाराला अचुक असावे
निश्चय त्यातुन अढळ दिसावे
आधी द्यावे नंतर घ्यावे
क्षीर सागरातिल प्राशावे
स्वतः हसावे अन हसवावे
मुक्त मोकळे कधी रडावे
आळस झटकुन पुन्हा उठावे
नित्य फुलावे नित्य गळावे
हवे स्वतःला तेच धरावे
नको नकोसे ते टाळावे
सुगंध उधळित मुक्त फुलावे
तन खुलवावे अन बहरावे
हृदय पाखरासंगे गावे