पावसा नर्तन थांबव
आकाश घालेल मांडव
भरलं फुलांचं मंदिर
उजळे पानांचा कंदील
सुगंधी पुष्पांची लहर
नाचे प्रत्येक प्रहर
तोरण नभाला रंगीत
झऱ्याचे कलकल संगीत
पारिजाताची रांगोळी
भुईची साडी जांभळी
रातराणीच्या चांदण्या
पानापानात देखण्या
वारा वाजवी बासरी
धारा चालल्या सासरी
बोरी आल्यात माहेरी
होडीत बसाया बाणेरी