मुला-मुलीच्या, दाम्पत्यांच्या, कुंडलीमधे, स्वार्थासाठी, ज्यांनी लिहिला, मरणयोग रे
धाडिल त्यांना, यमसदनाला, कर्मच त्यांचे, पूर्वभवातिल, लिहिण्या त्यांचा, जन्मयोग रे
कशास लिहिता, भ्याडांनो हे, भाकड भाकित, अज्ञानाने, मुलामुलींच्या, विश्वामध्ये
करा खरेतर, काम नेकिचे, आनंदाचा, मोक्ष मिळाया, पूर्ण जाणण्या, कर्मयोग रे
पोट भराया, भोग भोगण्या, भविष्य सांगुन, खोटेनाटे, मनुजांचे या, पुरते फसला
प्रेमळ पालक, सदा सुखी ते, भविष्य त्यांचे, छानच असते, जाणा त्यांचा, आत्मयोग रे