Sheel’ means character of human beings.
In Jain philosophy samyak:dardhan-dnyan-charitrya, is known as Ratnatray.
Here ‘charitrya’ means character. Meaning of ‘character’ is not only related with sex but also with purity of mind. Ego is the main enemy or disturbance in getting purity of soul.
In this poem the poetess gives a message that, Character of men and women must be examined or tested on equal basis. Here not only purity of body but also purity of mind must be considered.
In some cases purity of mind is more important than purity of body.
सोम्या-गोम्यांच्याही वदनी
शील बाईचे काचेची बरणी;
प्रश्न माझिया मनास पडला
शील नसावे ‘का’ पुरुषाला?
फक्त हवे का ते बाईला
नसावेच का ते पुरुषाला;
शील म्हणजे शील असते
जपणाऱ्यांना थ्रील असते
वरवरची झील नसते
पैसे देऊन भागवायचे
दुकानाचे बिल नसते
ओढून ताणून बसवलेले
कसलेही सील नसते,
मनाची ती शुद्धी असते
अध्यात्मातली ऋद्धी असते
संयमाने कमावलेली
अनमोल सिद्धी असते.
कधी कधी शील म्हणजे
एक काचेची बरणी असते
कधी गळणारी झरणी असते,
एक मात्र लक्षात ठेवावे
बरणीचे तन-मन स्वच्छ असावे
आरपार त्यातून दिसावे
अलगद झाकण वर बसवावे;
बरणी अपुली अशी जपावी
घाईने जरी वरून पुसली
आतून पण ती लख्ख धुवावी
देऊन तिजला ऊन कोवळे
खुशाल फेका तुम्ही सोवळे,
साखरआंबा गुलकंदाने
मोरावळा अन तिखटमिठाने
भरून ठेवा असल्या बरण्या
असतील मग त्या खऱ्या देखण्या;
काढून टाका फंगस-बुरशी
लांबच ठेवा झुरळनी माशी
लख्ख असावे झाकण साचे
टिकेल मग लिंबाचे लोणचे
त्यातच मुरवा मग मिरचीचे
तोंडी लावणे खास चवीचे ;
काल कुणी मज स्वप्नी म्हणाले
म्हणता म्हणता उगाच हसले
“शील बाईचे काचेची बरणी,
एकवार फुटली तर फुटली-
कामातून गेली”
ऐकून स्वप्नी अवाक झाले
मनात हसले हळूच वदले,
“चुकून कधी जरी बरणी फुटली
धरू नकाहो तोंडी गुळणी
तुकडे सारे करून गोळा
बंद करा पिशवीचा डोळा
कचरा पेटीत टाकावी पिशवी
फक्त काळजी एकच घ्यावी
काच न त्याची कुणा रुतावी;
पुन्हा आणुनी नवीन बरणी
चवीचवीने ठेवा भरुनी!
बरणी अथवा बाउल असुदे
काचेचा वा धातूचा असुदे
रंग निळा वा लाल असुदे,
जडपण त्यांचे जपण्यापेक्षा
नितळपण हो तिचे जपावे,
शुद्ध कटोरा घेऊन हाती
दान प्रीतीचे द्यावे घ्यावे” …