In the summer holidays children play different games like Chendufali (criket), hide and seek etc. After playing in the hot sun children buy Kulfi from Kulfivala. In Marathi the word ‘Garegar’ is used for Kulfi.
कोण खेळते चेंडू-फळी अन
कोण खेळते पळापळी…..
कुणी लंगडी घालत येते-
हळूच गुपचूप पाय बदलते;
पाठीवरती ‘खो’ घालुनी,
बसलेल्याला कुणी उठवते.
खेळ हुतुतू खेळत खेळत,
तू तू करुनी कित्ती थकते!
असे मजेचे खेळ रंगले,
रंगुन रंगुन सारे दमले,
पटांगणावर उन्हात बसले.
आला आला सायकलस्वार
विकावयाला गारेगार!
पडे गराडा त्याच्या भवती,
किती चालल्या गमती-जमती?
घेउन हाती गारेगार,
मुले लावती जिभेस धार-
शब्दांची घेऊन मशाल,
जिंकतील प्रेमाची माळ!