काव्यप्रकार – कुंडल
या काव्यप्रकारात एकूण सहा चरण असतात.
प्रत्येक चरणात एकूण २४ मात्रा असतात.
पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलेला असतो.
दुसऱ्या व चौथ्या चरणात अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या
चरणात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते.
शेवटच्या दोन चरणात आत्म्यावरभाष्य केलेले असते.
दुसऱ्या चरणात जो शेवटचा शब्द किंवा शब्द समूह
आलेला असतो त्या शब्दाने किंवा शब्द समूहाने
तिसरा चरण सुरु होतो किंवा दुसरा चरण हाच तिसरा चरण असतो.
पहिल्या चरणात ज्या शब्दाने किंवा शब्द समूहाने
काव्याची सुरुवात झालेली असते त्याच शब्दाने किंवा शब्दसमूहाने
शेवटच्या चरणाचा शेवट होतो.
प्रत्येक चरणात ११ वी मात्रा लघु व त्याच्या आधीची मात्रा गुरु असायला हवी.
कोणाला शोधून काढले गझलेने मम?
कुठले कुठले! पर्व शोधले गझलेने मम.
कुठले कुठले पर्व शोधले गझलेने मम?
कषाय त्यागुन फक्त शोधले पर्व पर्युषण.
देहामधल्या आत्ममंदिरी उत्सव त्याचा।
पुसता त्याचे नाव सांगते ‘प्रिय’ कोणाला…