बनायची आई दुर्गा अन
बनायचे बाबा मग आई।
“उठू नको तू भल्या पहाटे”
म्हणायचे मज “झोपच बाई”।
बूट करोनाचे मज घेण्या
हिंडायाचे पायी पायी।
म्हणायचे मज इमाम वेडा
ऐकून माझी बडबड गाणी।
‘पाकीट पैसा’ मला द्यायचे
हौसेखातर माझ्या काही।
रडायचे मी जेव्हा जेव्हा
उडायची बाबांची घाई।
गेल्यावरती निघून बाबा
दिसती बाबा ठाई ठाई।
बाबा गेले गेली आई
मूक जाहली मम अंगाई।
मित्र-मैत्रिणींसाठी माझ्या
लिहिते बडबड-गीते ताजी।
दुधावरी जी साय दाटते
त्याच्यावर मम माया सायी