This poem describes state of happy mind. Our mind becomes colourful like nature.
Various colours in nature like pink, green, blue, violet, blakish, yellow, red, purple are described in this poem.
अजून माझ्या मनी गुलाबी चाफा हिरवा दरवळतो रे
आठवणींचा मोर निळा तो धवल धुक्यातुन अवतरतो रे
गाभूळलेली चिंच तपकिरी दातावरती दात हुळहुळे
जांभुळ भरले झाड जांभळे जांभुळलेले दिवस कोवळे
रंग धरेचा पिऊन श्यामल बकूळ मातीत लोळण घेते
नक्षत्रांच्या पीत फुलांसम आठवणींची नक्षी सजते
जर्द लाल ते जास्वंदीचे वारियाने हलते कुंडल
कानी माझ्या अजून घुमते शीळ तुझी ती अवखळ चंचल
गुलबक्षी या रंगसरींनी पुन्हा पुन्हा मी भिजून जाते
जुन्या स्मृतींच्या श्रावणात मी इंद्रधनूवर झोके घेते