In this poem the poetess describes the atmosphere in the spring season. She also describes the state of our mind in that season.
पुन्हा पुन्हा अंतरात, नभ डोकावते
तळातले तप्त जल, उसळून येते
मातकट नीर तरी, लहरींची घाई
तळी साठलेली माती, किनाऱ्यास नेई
घनघोर युद्ध होई, श्यामल ढगांचे
धुवांधार वर्षेसाठी, वीज नाच-नाचे
मृण्मयीचे फटकारे, रेखीयती पात्रे
पापणीच्या पागोळ्यांनी शीत गात्र-गात्रे
वर्षताना घन घन, मन रिक्त होते
आठवांची सय सय, डोळी झाकोळते
वाहुनीच जावी आता, सारी जुनी माती
वीज पडो, जळो सारी, खोटी नातीगोती
अंतरीचे बोल माझ्या अमृताचे व्हावे
वळीवाच्या पावसात चिंब मी भिजावे