In this poem the poetess says, Jinvaani is our mother.
गर्जा जयजयकार जिनांचा गर्जा जयजयकार
क्षमा धर्म हे भूषण अमुचे त्यागू क्रोधास
त्याग तपाची परंपरा ही आगम धर्मात
हृदय शुचिता शुभ्र जलासम मनात खळखळणार
जिनवाणी ही माय आमुची धर्मामृत पाजे
तिच्या तनूवर मार्दव आर्जव अलंकार साजे
माय शारदा गुरूमुखातून अखंड झरझरणार
भूल न पाडिती अम्हास आता मोहांच्या बागा
संयमपुष्पे हृदयामध्ये सत्वर हो फुलवा
जिनधर्माची ध्वजा मुक्त या नभात फडफडणार
लोभाच्या या तोडुन भिंती अकिंचन्य पाळा
णमोकार हा मंत्र जपोनी पळवा पापाला
सत्य अहिंसेचाहा डंका नभात दुमदुमणार
मोक्षराणी ही सुंदर रमणी ब्रम्हचर्य मुकुट
पळवुनी कामा धरूया आता मुक्तीची वाट
रत्नत्रय हे त्रिशूल घेऊन करू लोकाकाशा पार