In this poem ‘Shubhra Nilai’, nature’s beauty is described. The beauty of streams, waterfalls, a clean blue sky and greenery is portrayed.
जिथे पहावे तिकडे निर्झर,
खळाळणारे प्रपात निळसर ..
आकाशाची शुभ्र निळाई,
हसते सृष्टी दिसते सुंदर!
जिथे पहावे तिकडे हिरवळ,
फुलाफुलांचा मनात दरवळ …
आगिनगाडी झुकझुक चाले,
हसते धरणी खळखळ खळखळ!!