स्वप्न पाहिले होते तेंव्हा फक्त तुझेकी त्यांचेही
या प्रश्नांचा माग काढण्या अजूनही बघ गाते मी
भेटी अपुल्या त्या तेंव्हाच्या दर्पणातल्या प्रीतीच्या
क्षण अनुभवण्या हुरहुरणारे मागे मागे जाते मी
शांत तडागाच्या काठावर बसुन पाहता प्रतिबिम्बा
बिंबामधली अनंत रूपे तुझीच बघुनी खुलते मी
जे जे माझे ते सर्वांचे वेगवेगळे ना काही
सुटता गुंता उजळुन जाते तुझे नि माझे नातेही
मात्रावृत्त(८+८+८+६=३०मात्रा)