कसं लिहू काय लिहू म्हणता म्हणता लिहिती झाले
प्याला दिला साकीने जो पोटामध्ये रिचवित गेले
बरळत सुटले वाचत सुटले रडत हसत लिहित सुटले
गझलांवरती गझलांचे मी सुंदर इमले रचत गेले
रंगून गेले माझे इमले गगन अवघे चुंबीत गेले
प्रेमिकांना अचंबीत करून स्वतःमध्ये रंगून गेले
चुंबन कोणा वंदनीय कोणाकोणाला पूजनीय
कोणा अगदी तिरस्करणीय!
पण मन म्हणते वेडे माझे
होते सारे अविस्मरणीय
होते सारे अविस्मरणीय…